Headlines

मा.अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 450 जणांनी केले रक्तदान

वाढदिवस साजरा करताना अनेकांचा केला कोवीडयोद्धा म्हणून सन्मान

पंढरपूर/नामदेव लकडे – धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.अभिजीत आबा पाटील यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ४० गावामधील ग्रामपंचायत शिपाई, व आरोग्य सेविका, आशाताई, अंगणवाडी सेविका,यांचा कोविड योध्दा सन्मान करण्यात आला. तुमचं काम म्हणजे ईश्वर सेवेसारखे आहे. कोरोनाच्या काळात आपण स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकांना आधाराची खरी ताकद देत आहेत.त्याच निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अभिजीत आबा पाटील मित्र परिवारांनी वाढदिवसानिमित्तकाल देगाव याठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले तर आज सर्वठिकाणी मिळून ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले , पुढील काही दिवस ही  ठिकठिकाणी गावामध्ये रक्तदान आयोजित करण्यात केले आहे असे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी सांगितले.
तसेच पंढरपूर तालुक्यातील वाखरी, देगाव, सुस्ते, उपरी, अजनसोंड,मगरवाडी,रोपळे, पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, चिंचणी, खेडभाळवणी, पळशी, नांदोरे, आव्हे यासह ४० गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सॅानिटायझर, मास्क वाटप, खाऊ वाटप, मातोश्री वृध्दाश्रम, पालवी, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम अशा विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले होते. कोरोनाच्या संकटात नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध गावात आरसेनीक अल्बम गोळ्याचे वाटप केले. कोरोना च्या काळात ज्या आशावर्कर , आरोग्य कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जी कामगिरी बजावली त्यामुळे त्यांना भेटवस्तू देऊन कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित डिव्हीपी उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवारांनी कार्यक्रम पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *