Headlines

मालवंडी येथे कोरोना जागृती रॅली

बार्शी/प्रतिनिधी – एकात्मिक बाल विकास विभाग पंचायत समिती बार्शी च्या वतीने मालवंडी येथे कोरोना जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोरोना कालावधी मध्ये घ्यायची काळजी,हात धुण्याचे महत्त्व, सोशल डिस्टंसिंग चे महत्व तसेच लसीकरणाचे महत्त्व याबद्दल गावामध्ये जनजागृती करण्यात आली. मास्कचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे. शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे.जेणेकरून गाव कोरोना मुक्त होऊ शकेल याबद्दल या रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली.

बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.मालवंडी चे सरपंच हनुमंत होनमाने , ग्रामपंचायत सदस्य नवनाथ गवळी, रामलिंग घेवारे, शिवाजी पाटील, पर्यवेक्षिका अनुराधा मिस्किन ,भोसलेे सर , मुंडे सर, भारत होनराव, कुलकर्णी सर, नितीन पाटील यांनी या रॅलीमध्ये उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन केले.

रॅली यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका जयश्री उकरंडे, जिजाबाई यादव, रेणुका राजगुरू, दिपाली यादव , मदतनीस सुरेखा काटे, आशा क्षिरसागर, प्रभावती भागवते, राणुबाई सरवदे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply