दिल्ली /वृत्तसंस्था -मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या मुलाचे गुरुवारी सकाळी निधन झाले. आपल्या मुलाचे निधन झाल्याची बातमी त्यांनी ट्विटरद्वारे दिली. ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की आशिष येचूरी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचारी आणि इतर असंख्य लोक जे आमच्या पाठीशी होते . त्या सगळ्यांचा मी आभारी आहे.
34 वर्षीय आशिष येचुरी पेशाने पत्रकार होते. दिल्लीतील गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.आशिष यांनी एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम चेन्नई येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये टाइम्स ऑफ इंडिया व तसेच अनेक माध्यमांमध्ये काम केले होते .
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो ने आशिषच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माकपाचे राज्य सचिव आडम मास्तर, किसान सभा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे समवेत अनेक नेत्यांनी आशिष यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.