Headlines

महाराष्ट्र बेरोजगार नोंदणी अभियानास सोलापूरात सुरुवात…

माझी नोकरी कुठे आहे ? – विक्रम कलबुर्गी
सोलापूर – माझी नोकरी कुठे आहे ? हा तरुणाईचा ज्वलंत सवाल घेऊन बेरोजगाराला रोजगार मिळालेच पाहीजे ही प्रमुख मागणी घेऊन भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय. ) संपूर्ण महाराष्ट्रात बेरोजगार युवकांची नोंदणी करून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात लढा उभाणार आहे.यासाठी महाराष्ट्र बेरोजगार नोंदणी या ऑनलाइन पोर्टलवर सुरू केले आहे अशी माहिती विक्रम कलबुर्गी यांनी दिली.
भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने या नोंदणी अभियानाची सुरुवात शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी करण्यात आली.याचे उदघाटन कार्यक्रम कॉ गोदुताई परुळेकर नगर येथे युवा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष साथी अशोक बल्ला यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. भा.लो.युवा महासंघ गोदुताई नगर तालुका कमिटीच्या वतीने या बेरोजगार नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कोरोना साथीच्या आजारापूर्वीही बेरोजगारी साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरत होती. आता तर बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवीन रोजगाराची निर्मिती होत नाही. केंद्र आणि राज्य सरकार ने तरुणांना वार्‍यावर सोडले आहे. डीवायएफआय अशी मागणी करते की सरकार, सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्रातील नोकरभरती करावी, सर्व क्षेत्रातील रिक्त जागा जाहीर कराव्यात, ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, नागरी रोजगार हमी योजना सुरू करावी सर्व बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेकारी भत्ता म्हणून रु.10,000 देण्यात यावे. अशा तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.बेरोजगार आणि कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या नोकरीतील सर्व बेरोजगार युवक – युवतीनी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने आवाहन करीत आहोत की त्यांनी आपली नोंदणी महाराष्ट्र बेरोजगार नोंदणी या पोर्टलवर नोंदवावे जेणे करून आपण सर्वजण मिळून सर्व तरुणांसाठी आपली योग्य नोकरीची मागणी सक्तीने सरकारसमोर ठेवून लढा अधिक तीव्र करून रोजगार / नोकरी मिळवू शकतो. अशी मांडणी जिल्हा नेतृत्वाकडून करण्यात आली.
सदर ही मोहीम येत्या 10 नोव्हेंबर 2020 पर्यंत राबविण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व बेरोजगार ,कंत्राटी तत्वावर काम करणारे कर्मचारी , युवक युवतींनी या ऑनलाईन बेरोजगार नोंदणी अभियानात सहभागी व्हावे असे , आवाहन उदघाटन कार्यक्रमात युवा महासंघाचे चे राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला यांनी केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 50 युवकांनी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. यावेळी युवा महासंघाचे चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव अनिल वासम, जिल्हा सहसचिव दत्ता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय हरसुरे यांनी केले.यावेळी बालकृष्ण मल्याळ, प्रशांत म्याकल,अप्पाशा चांगले, मधुकर चिलाळ, अकील शेख, नरेश गुल्लापल्ली , असिफ पठाण, विनायक भैरी, शाम आडम, भारत दिलपाके, दिनेश बडगू, प्रभाकर गेंट्याल,नानी माकम, यांच्यासह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply