Headlines

मळेगाव शिवारातील सोयाबीन पिके टाकू लागली माना , शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण

बार्शी ::- बार्शी तालुक्यामध्ये पावसाने सर्वच भागात सुरवात चांगली केली,त्यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर सुरु झाली,व चांगला पाऊस होणार म्हणून हवामान खात्याने अंदाज वर्तविला व शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसावर बियाणे,खत,मोठ्या प्रमाणात खरेदी करून खरिपाची पेरणी उरकून टाकली,व पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागले,परंतु ते हसू काही काळ टिकले,पेरणी होऊन पंधरा वीस दिवस झाले, परंतु म्हणावा तसा अजून देखील मळेगाव शिवारात पाऊस पडला नाही, दररोज कोरडे ढग येतात जातात व दिवसा प्रचंड प्रमाणात उष्णता वाढत आहे,त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते,व पेरणी केलेले पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे,त्यामुळे मळेगाव मधील शेतकरी पावसासाठी आभाळाकडे नजरा लावून बसला आहे, व वरूण राजा लवकर बरस म्हणून एकच विनंती करत आहे.

Leave a Reply