Headlines

मराठा आरक्षण प्रकरणी सोलापुरात त्रीव्र पडसाद



सोलापूर/अमीर आत्तार -बहुचर्चित मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून आज मराठा समाजाने जिल्हा बंदी ची हाक दिली होती शहरात शिवाजी चौक येथून मराठा समाजाच्या आसूड आंदोलन ला सुरुवात झाली असून त्याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले असून या आसूड आंदोलनात मराठा समाज हजारोच्या संख्येने सामील झाले होते शिवाजी चौक येथे मराठा तरुणांनी एक मराठा लाख मराठा ,या सरकार चे करायचा काय खाली मुंडी वर पाय ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अश्या गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडण्यात आला.
लोकप्रतिनिधीना घेराव
मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलन कर्त्यांनी शहरातील आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे या आमदारांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन कर्त्यांनी आरक्षण प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .
या मराठा आसूड आंदोलनात शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, रिपब्लिकन पार्टी चे राजाभाऊ सरवदे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड चे फारुख शेख, शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण नगरसेवक मनोहर सपाटे चेतन नरोटे, भाऊसाहेब रोडगे, विनोद भोसले, गणेश डोंगरे,राष्ट्रवादी चे संतोष पवार समन्वयक माऊली पवार, ए आय एम आय एम पक्षाचे तोफीक शेख यांच्या सह मराठा बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. या मराठा आरक्षण ला सोलापूर शहरातील विविध पक्षानी व सामाजिक संघटना नी पाठींबा दिल्याने शहरातील अनेक बाजारपेठा बंद होत्या .
मोठा पोलीस बंदोबस्त
शहरातील मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलनच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली होती

Leave a Reply