Headlines

भाषण नको राशन द्या -लोकायत च्या वतीने ऑनलाइन अभियान

लोकायत आयोजित ऑनलाईन अभियान सादर
“रेशन आमच्या हक्काचे”

पुणे: लॉकडाऊनमुळे सरकारने विना रेशनकार्डधारक व रेशनकार्डधारक (पिवळे /केशरी) यांच्यासाठी नव्याने विविध योजना चालू केल्या होत्या, त्याची मुदत ३० जून २०२० ला संपत आहे. त्यानंतर आज पंतप्रधानांनी टीव्ही वरून भाषण देत कालावधी जरी वाढवला तरी फक्त गहू किंवा तांदूळ आणि डाळ देऊ अशी घोषणा करून टाकली. यामुळे सरकारने रेशन योजनांचा कालावधी अजून कमीत कमी ६ महिन्यांसाठी वाढवावा आणि फक्त गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल सोबत जीवनावश्यक वस्तू यासाठी लोकायत संघटनेतर्फे “रेशन आमच्या हक्काचे”या विषयावर ऑनलाईन अभियान गुरूवार, दि. ३० जून २०२० रोजी संध्या. ७.३० वाजता सोशल मीडियावर करण्यात आले. या विषयावर राशन साहित्यासोबत फ़ोटो, व्हिडिओ पाठवण्याचे आणि स्वतःच्या सोशल मीडियावर टाकायचे आवाहन केले होते. यावर अनेक लोकांनी प्रतिसाद देत फेसबूक, ट्वीटर आणि इतर सोशल माध्यमांचा वापर करत रेशन योजनाबद्दल आपलं म्हणण मांडल. वस्तीत राहणारया महिलांनी “भाषण नको राशन द्या”, टॅक्सचा पैसा कशासाठी… मोफ़त राशन मिळण्यासाठी”, “रेशन आमच्या हक्काचे” असे पोस्टर लिहून आपला आवाज सामाजिक माध्यामांमार्फ़त उठवला.

सरकारने विना रेशनकार्डधारक असो कि रेशनकार्डधारक (पिवळे /केशरी) यांच्यासाठी ज्या नवीन योजना चालू केल्या होत्या, त्याची मुदत ३० जूनला संपत आहे. अंत्योदय व प्राधान्य गटाला मिळणारे नेहमीचे धान्य सोडून बाकी सर्व योजनांची मुदत ३० जून रोजी संपत आहे. सध्या बऱ्याच प्रमाणात लॉकडाउन शिथिल केला असला तरी अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्यासाठी, कष्टकरी वर्गाचे जीवन सुरळीत चालू होण्यासाठी व पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच काळ जावा लागणार आहे. 30 जून रोजी संपणार्‍या या योजेनेची मुदत 6 महीने वाढविण्यात यावी ,अशी मागणी लोकायत तर्फे करण्यात आली.  हे सरकार हे सहजपणे करू शकते, सरकारकडे एवढा पैसा व धान्य आहे. “रेशन आमच्या हक्काचे” या अभियानाला दलित स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय बहुजन सेना व राज्यभरातील संघटनांनी समर्थन करत सामाजिक माध्यमांतून रेशन योजनाबद्दल आपलं म्हणण मांडल.

लोकायत संघटना लॉकडाऊन लागू झाल्यापासून लोकांना आपल्या हक्काचे रेशन मिळावे यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत आहे. मग ते सरकारने कोरोना काळात रेशन संदर्भात ज्या योजना चालू केल्या त्या सोशल मीडिया मार्फत त्याचा प्रचार करणे असो, लोकांच्या अडीअडचणी , प्रश्न सोडवणं असो अन दुसऱ्या पातळीवर अधिकारी व सरकारवर रेशन व्यवस्था चांगली होण्यासाठी दबाव आणणे, निवेदन देणे, अशी अनेक प्रकारची कामे करत आहोत. आजच्या या ऑनलाईन अभियानाला महाराष्ट्रमधून लोक सहभागी झाले होते. राज्यभरातून या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.अशी माहिती लोकायत तर्फे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *