Headlines

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेतर्फे ईदनिमित्त गरिबांना मोफत कपडे वाटप

कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रसिद्ध अशी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेने इदनिमित्त एक स्तुत्य राबवून पंचक्रोशीतील जनतेत एक आगळेवेगळे तसेच आदराचे स्थान निर्माण केले आहे.  ईद निमित्त या संस्थेचे अध्यक्ष महेमुदभाई सैय्यद यांच्या पुढाकारातून शिर्डीतील कनकुरी परिसरातील पाटवाडी भागातील जवळपास शंभर गरीब कुटुंबियांच्या लहान मुलांना मोफत कपड्याचे वाटप करण्यात आले. त्यासोबत त्यांना फळं व अल्पोपहार याचे देखील वाटप करण्यात आले.  लॉक डाऊन मुळे हलाखीचे जीवन जगत असणाऱ्या या कुटुंबियांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. नवीन कपड्यांचा व खाऊचा आनंद त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
           संस्थेच्या या उपक्रमाचे जनतेतून मोठे स्वागत करण्यात आले. ही संस्था नेहमी असे समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. देशात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि सदर रक्कम ही या गरीब मुलांच्या कपड्यांसाठी वापरली. यातून खरी ईद साजरी झाल्याचे समाधान आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेमुदभाई सैय्यद म्हणाले. याही पुढे हे काम अविरत सुरू राहील असेही ते म्हणाले. संस्थेच्या या कार्यात हाजी समशुद्दीन शेख, सरदार पठान, अशरफ सय्यद, दादा इनामदार, अखलाख खान, यूनुस सय्यद,साजिद शेख, मुख्तार सय्यद, हैदर सय्यद, नूरा पठान, नदीम असगरअली, बरकतअली सय्यद,अकरम सय्यद,आदिल पठान, अरशद शाह, शाकिर शेख,जावेद इनामदार, मोसिन सय्यद,मतीन सय्यद, फरदीन पठान आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *