Headlines

भरपावसात केले आयुर्वेदिक काढ्याचे वाटप-युवा उद्योजक लखन माने यांचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर/नामदेव लकडे -पंढरपूरातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणारे समाजसेवक लखन माने यांनी काल तुलसीदासनगर,गोपाळपूर येथे भर पावसात आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या प्रमाणानुसार आयुर्वेदिक काढा व अर्सनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले.यावेळी सर्व नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजनही  चेक करण्यात आले.कोरोनाने सवत्र हाहाकार माजवला आहे.त्याच्या फैलावाच्या वेगाने संपूर्ण देशभरातील लोक भयभीत झाले असताना स्वतःच्या जीवाची तमा न करता लोकांसाठी झटणारे अनेक लोक पुढे येत आहेत.आपल्या निस्वार्थी सेवेच्या व कामाच्या जोरावर लोकांची मने जिंकत आहेत.
पंढरपूर शहरातही अनेकजण आपापल्या परीने कोरोनाच्या लढाईत आपले योगदान देत आहेत.याच काळात एका युवा उद्योजकाने आपल्या चोख व प्रामाणिक कामाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.तो युवा उद्योजक म्हणजे लखन माने.या युवा उद्योजकाने आजवर व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई झोपडपट्टी,अण्णाभाऊ साठे नगर, तुळशीदास नगर, गोपाळपूर येथे आतापर्यंत दहा हजार लोकांना गोळ्या व काढा वाटप केला आहे.त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाच्या भीतीने लोकप्रतिनिधी दिसेनासे झाले असताना एका युवा उद्योजकाने गरजू लोकांसाठी चालवलेली ही मदतीची मोहीम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे  हा काढा वाटप करताना युवा उद्योजक लखन दादा माने यांना प्रणव नाझरकर,तुकाराम खंदाडे सर, सचिन दिवटे,प्रमोद कुलकर्णी आदींचे  सहकार्य लाभले.यांच्यामार्फत तुळसिदास नगर गोपाळपूर या ठिकाणी घरोघरी जाऊन हा काढा नागरीकांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *