Headlines

बार्शी नगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ऑनलाईन फेसबूक व्याख्यानमाला सुरू

बार्शी- बार्शी नगरपालिका बार्शी यांच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने फेसबूक ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे ही व्याख्यानमाला रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाली आहे.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 यांच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे.

व्याख्यानाची सुरुवात बार्शी नगरपालीकेमधील हॉलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माननीय नगराध्यक्ष एडवोकेट आसिफ भाई तांबोळी, कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे, प्रशासनाधिकारी शिवाजी कांबळे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला आप्पासाहेब राऊत, प्रवीण मस्तूद, हमीद पटेल, अनिरुद्ध नकाते, पवन आहिरे,पप्पू हनुमंते, तुषार खडके, अभिमान आबा आगलावे, नूर मुल्ला हे उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉक्टर महेंद्र कदम यांच्या व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानमाला सुरु करण्यात बार्शी नगरपालिका एकमेव नगरपालीका असल्याचे यावेळी नगराध्यक्ष एडवोकेट असिफ भाई तांबोळी यांनी सांगितले.

11 ऑक्टोबर 2020 रोजी पासून सुरू झालेली ही व्याख्यानमाला रोज सायंकाळी चार वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 बा.न.पा. बार्शी या फेसबूक पेजवरून लाईव्ह होणार आहे तरी या व्याख्यानांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आव्हान नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply