Headlines

बार्शीत कोरोना तपासणी { स्वब टेस्ट } ची सोय करण्यात यावी.

बार्शी – मागील काही दिवसात बार्शी तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.याचा ताण सोलापूरच्या तापसणी केंद्रावर येत आहे. त्यामुळे टेस्ट चे रिपोर्ट यायला उशीर लागत आहे.असे घडू नये व सोलापूरच्या लॅब वरील ताण कमी व्हावा ,  म्हणून बार्शीच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणी { स्वब टेस्ट } ची सोय करण्यात यावी. अशी मागणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे शरद घुमटे यांनी निवेदना द्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की , बार्शी येथे स्वब तापसणी केंद्र सुरू झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी ,माढा ,करमाळा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील  परांडा तालुक्याच्या नागरिकांना होईल.बार्शीत तपासणी { स्वब टेस्ट } ची सोय झाल्यास सोलापूर येथे तपासणी साठी येणार्‍या रुग्णाची संख्या कमी होऊन तालुका पातळीवर तत्काळ उपचार सुरू करण्यास मदत होईल. तसेच बार्शी ग्रामिण रुग्णालयात ऑक्सीजनची सोय करण्यात यावी.

यासंबधी निवेदन दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीने जिल्हा परिषदेचे सीईओ व सबंधित अधिकारी यांना पाहणी करून अडचण सोडवा. तसेच तात्काळ बार्शी दौरा करा.अशा आशयाचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस शरद घुमटे यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *