Headlines

बँक ऑफ महाराष्ट्र च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे शिवार हेल्पलाइनकडुन आवाहन , थकित कर्जदारांसाठी विशेष तडजोड योजना

 



उस्मानाबाद :- बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची राज्य समन्वयक असलेली राष्ट्रीयकृत बँक आहे. गेल्या काही वर्षापासून कृषी क्षेत्रावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ, पूर, गारपीट ,अतिवृष्टी व इतर बाह्य कारणांमुळे झालेले शेतीचे नुकसान याचा विचार करून शेतकऱ्यांसाठी एकरकमी तडजोड योजना (ओ. टी.एस.) आणली आहे. या योजनेनुसार ज्या शेतकरी कर्जदारांची शेती कर्जे दि.३१/०३/२०२० रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे वा इतर बाह्य कारणांमुळे अनुत्पादक (एन. पि. ए.)झालेली आहेत व ज्यांच्याकडे रु १० लाखांपर्यंत कर्जबाकी येणे आहे अशी सर्व कर्ज खाती या योजनेसाठी पात्र आहेत.

      कुठल्याही ओ.टी.एस. योजनेअंतर्गत लाभ घेतलेले कर्जदार साधारणतः त्या बँकेकडून पुनश्च कर्ज घेण्यास अपात्र असतात. परंतु या विशेष ओ.टी.एस. योजने अंतर्गत रु १० लाखांपर्यंत कर्जबाकी असणारे सर्व शेतकरी पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज मिळण्यास पात्र आहेत, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. तसेच या योजने अंतर्गत संचित व्याज पूर्णपणे माफ केले जाणार असून कर्ज बाकी वर आकर्षक सूट दिली जाणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी इतर कर्जे उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज इत्यादी घेतली आहेत त्यावर देखील बँकेच्या नियमानुसार सूट दिली जाईल.

      तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकरी बांधवांनी या योजनेचा फायदा करून घ्यावा व कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

  यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी  अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

One thought on “बँक ऑफ महाराष्ट्र च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे शिवार हेल्पलाइनकडुन आवाहन , थकित कर्जदारांसाठी विशेष तडजोड योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *