Headlines

प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांना अविष्कार सोशल फाउंडेशन इंडिया कोल्हापूर या संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

वडाळा: अविष्कार सोशल शैक्षणिक  फाउंडेशन इंडिया कोल्हापूर या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेने शिक्षक दिनी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा श्रीकांत दिलीप धारूरकर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार संस्थेने जाहीर केलेला आहे.   सदर पुरस्काराचे वितरण दिनांक पाच सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.  तसेच लोक डाऊन संपल्यानंतर   कोल्हापूरमध्ये  सर्व गुणवंत शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार श्री संजय पवार यांनी सांगितले.  प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांचे मागील दहा वर्षाचा अध्यापनाचा अनुभव, राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम,  राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन लेख प्रकाशित, प्रशासकीय कार्य, अभ्यास व चिकित्सक वृत्ती, सामाजिक क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून कार्य,  संघटनेचे कार्य, नेतृत्व गुण कौशल्य आदी गोष्टींचा विचार करून त्यांना प्राचार्य गटामधून संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. याबद्दल त्यांना विचारले असता,  पुरस्कार प्रदाते यांचे आभार मानले तसेच हा पुरस्कार प्रेरणा देणारा आहे असे सूतोवाच केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *