प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस AISF नाशिक तर्फे बेरोजगार दिन म्हणून साजरा

नाशिक / स्वप्नील भोईर – दि.१७ सप्टेंबर २०२० रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (ए.आय.एस.एफ) नाशिक तर्फे शहरातील सी.बी.एस परिसरात केक कापून बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. मोदीजी गेले ६ वर्षे जगातील सर्वाधिक बेरोजगारी असलेल्या देशांमध्ये भारताने उच्चांक गाठावा यासाठी प्रयत्नशील आहेत, काँग्रेस पक्षाला जे ७० वर्षात शक्य झाले नाही ते तब्बल ६ वर्षांत मोदींजींनी करून दाखवले आहे. देशाला दरवर्षी २ करोड (बे)रोजगार देऊ हे आपले आश्वासन मोदीजींनी पूर्णत्वास नेले आहे असे उपस्थित विद्यार्थी युवक प्रतिनिधींनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
त्यांच्या कार्याची दखल घेत देशभर विद्यार्थी युवक आपापल्या परीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १७ सप्टेंबर बेरोजगार दिवस म्हणून साजरा करत आहेत. ए.आय.एस.एफ ही मागणी करत आहे की केंद्र सरकारने मोदीजींच्या परिश्रमांची दखल घेऊन १७ सप्टेंबर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून जाहीर करावा अन्यथा आम्ही युवक थाळीनाद करून दिवे लावून प्रशासनाच्या विरोधात बंद पुकारू असे देखील उपस्थितांनी सांगितले. याप्रसंगी हर हर मोदी घर घर मोदी अश्या घोषणा देखील देण्यात आल्या.
याप्रसंगी विराज देवांग, अविनाश दोंदे, तल्हा शेख, अपूर्व इंगळे, ज्ञानेश्वर काळे, मुकुंद दीक्षित, अक्षय दोंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply