Headlines

पोलीस वर्दीतील देवमाणूस – सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुदळेकर साहेब

खरोखरच पोलीस वर्दीतील देवमाणूसच,ना पदाचा कोणता बडेजाव ना कोणती पुशारखी,आगदी सध्या माणसाप्रमाणे नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढणे हे साहेबांची खासियत

समाज्यामध्ये पोलीस या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन जरा वाईटच असतो,कारण पोलीस म्हणजे पैसे घेणारा, पोलीस म्हणजे उद्धट बोलणारा, पोलीस म्हणजे पोलीसी खाक्या दाखवणारा अशी अनेक नावे जनतेने पोलिसांना देऊन ठेवलीत,परंतु पांगरी पोलीस ठाण्यात सचिन हुंदळेकर हा देवमाणूस सहायक पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झाले,व पोलीस स्टेशनचे रूपच पालटले.माझी व साहेबांची ओळख मळेगाव येथील ग्रामपंचायत मधील पहिल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात झाली,पुन्हा लगेच गणेश उत्सव आला व श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहा म्हणून विनंती करण्यासाठी दुसरी भेट,या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली.  
मी माझ्या गावाबद्दल माहिती दिली.माझे गाव कसे आहे.माझ्या गावातील नागरिक कसे आहेत,व आमचे श्री शिवाजी तरुण मंडळ कसे सामाजिक कामे करत आहे, ही माहिती सांगितल्यानंतर खरोखरच साहेबांनी मळेगाव चे कौतुक केले,ज्या वेळेस गावामध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला की त्या कार्यक्रमामध्ये साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असायचे.साहेब व मळेगावचे एक कौटुंबिक नाते तयार झाले होते.
खरोखरच पोलीस वर्दीतील देवमाणूसच,ना पदाचा कोणता बडेजाव ना कोणती पुशारखी,आगदी सध्या माणसाप्रमाणे नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढणे हे साहेबांची खासियत,साहेब तुमची बदली झाली,व तुम्ही आम्हाला रडूवून गेलात,साहेब तुम्ही तुमच्या कार्यकिर्दीत श्री शिवाजी तरुण मंडळाने राबवलेल्या सुकन्या योजनेची व विविध उपक्रमाची माहिती संपूर्ण पांगरी पोलीस ठाण्यातील गावात सांगितली.
तुम्ही अनेक गावांना मळेगावचा आदर्श घेण्यास सांगितले, म्हणून साहेब तुम्ही वर्दीतील देव माणूस होण्यास पात्र आहात,साहेब पांगरी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आपला चेहरा मला कायम त्या तुमच्या खुर्चीवर दिसेल असे प्रेम तुम्ही आम्हाला दिले,म्हणून तुम्ही वर्दीतील देवमाणूस होण्यास पात्र आहात,साहेब आपली खूप आठवण येईल,आठवण आली की आम्ही तुम्हाला जरुर हक्काने फोन करू कारण जिवलग माणसाला तुम्ही इतके प्रेम दिले,आहो खाकी वर्दीतील देवमाणूस होण्यासाठी आपण जे कष्ट घेतले त्या कष्टाला माझा सलाम आपण पोलीस प्रशासनात यशाची उंच शिखरे सर करावी हीच नर्मदेश्वर नागनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. 
शब्दांकन:-अशोक माळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *