Headlines

पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या – भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

बार्शी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिल व आयटक कामगार केंद्र यांच्या वतीने दिनांक 22 जून 2020 रोजी पेट्रोल व डिझेलची भाववाढ मागे घेण्याची मागणी मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. हे निवेदन मा. तहसिलदार, बार्शी यांचे मार्फत काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, कोविंड 19 मुळे लागू केलेल्या लॉक डाऊन मध्ये कामगार कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यवसायिक, शेतकरी हे सर्व बेहाल आहेत.बेरोजगारी वाढली आहे.जगणे मुश्किल झाले आहे.आजाराचा विळखा सरकार रोखण्यात अपयशी होत आहे.यातच पेट्रोल, डिझेलची भाव वाढ करून महागाईचा भडका उडवून दिला आहे. पेट्रोल व डिझेलची भाव वाढ करून सरकार गरीब जनतेला लूटत आहे. शेतकरी, कामगार वर्ग दोनचाकी गाड्यासाठी पेट्रोल वापरीत आहे. ह्या भाववाढीमूळे परवडणारे नाही. गरिब जनतेला कित्येक कोटीं रूपयांच्या योजना केल्या असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरऱ्या बाजूला लूट चालू आहे. याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केद्र तीव्र विरोध करीत आहे. ही पेट्रोल व डिझेलची भाव वाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी करीत आहोत.लॉकडाउन मूळे शेतकरी नुकसानीत आहे. त्यात महागाई वाढली असल्याने सरकारने शेतकऱ्यांना बांधावर बी – बीयाने व खते पुरवावीत. तसेच चंद्रपुर येथील ब्रम्हपुरी तालूक्यातील काॅम्रेड विनोद झोडगे यांचे वर ब्रम्हपुरी तहसिलदारने 353 चा खोटा गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा मागे घेवून ब्रम्हपुरी येथील तहसिलदार यांची चैकशी करावी अशी मागणी देखील केली आहे.

यावेळी तहसिल कचेरी समोर कार्यकत्यांनी एकत्र येत निवेदन देतेवेळी हातात पोस्टर धरले होते. निवेदनावर भाकप राज्य कौन्सिल कार्य सदस्य काॅम्रेड तानाजी ठोंबरे, काॅम्रेड प्रविण मस्तुद, काॅम्रेड शौकत शेख, .काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, काॅम्रेड पवन आहिरे यांच्या सह्या आहेत तसेच कॉ. पैगंबर मूलाणी, रामभाउ कदम, दत्ता्त्रय जगदाळे, बालाजी ताकभाते, सुभाष पिंगळे, कॉ. बालाजी शितोळे, कॉ. शाफीन बागवान हे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply