Headlines

पिंपरी येथे शहीद जवान सुनील काळे यांना वाहिली श्रद्धांजली

बार्शी- बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र शहीद मेजर सुनील काळे यांना जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले.त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण भारत देशातून दुःख व हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी (सा) येथे बुधवारी सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मेजर सुनील काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पिंपरी गावचे सुपुत्र मेजर हनुमंत वायकर व मेजर बळवंत वायकर यांनी पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली.पद्माकर काटमोरे,राजेश काशीद,चेतन काशीद,मनोज काटमोरे यांनी मेजर सुनील काळे यांची शौर्यगाथा व देशासाठी दिलेले बलिदान स्पष्ट करीत शब्द सुमनांनी आदरांजली वाहिली.मेजर बळवंत वायकर व ग्रामस्थ यांनी अमर रहे अमर रहे मेजर सुनील काळे अमर रहे हा घोष केला.हिस्सार,हरियाणा येथे देशसेवा बजावत असलेले मेजर हनुमंत वायकर यांनी सुनील काळे यांना आलेले वीरमरण कोणताच भारतीय विसरणार नाही,शूर धाडशी जवानाला आज देश मुकला आहे असे मत आदरांजलीपर भाषणातून व्यक्त केले.देशातील युवकांनी पुढे येत देशसेवा करण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे.

मेजर सुनील काळे यांच्याकडून प्रेरणा घेत यापुढेही उत्तमोत्तम देशसेवा बजावत राहीन असे मत मेजर वायकर यांनी व्यक्त केले.यावेळी नानासाहेब काशीद,हनुमंत काशीद,हरिशचंद्र काटमोरे,अर्जुन काशीद,अनिल काशीद,तानाजी गवळी,,महामुनी,सचिन काशीद,अविनाश काशीद,राहुल काशीद,शुभम काशीद,नागेश काशीद,जयंत काशीद,सदानंद काशीद,
प्रमोद काशीद,अरविंद काशीद,लक्ष्मण काशीद हनुमंत काटमोरे,राघवेंद्र काशीद,सचिन काशीद,विठ्ठल पाटील,तुषार काटमोरे,योगेश काटमोरे,उपस्थित होते.

Leave a Reply