पलूस येथील जीवे ठार मारण्याच्या प्रकरणातून आई-वडिलांसह दोन मुलांची जामिनावर मुक्तता


सांगली – ऊस तोडीचा राग मनात धरून महादेव आश्रुबा बडे यास मधुकर बापू सौदरमल , अमोल मधुकर सौदरमल ,सचिन मधुकर सौदरमल ,अरूणाबाई मधुकर सौदरमल यांच्यासह अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी व उसाच्या कोयत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या बाबतचा प्रकरणातून वर नमूद चौघा संशयित आरोपींचा जामीन सांगली येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस पी पोळ साहेब यांनी मंजूर केला आहे.


यात हकिकत अशी की सदर महादेव आश्रुबा बडे यास वर नमूद संशयित आरोपींनी ऊसतोडीच्या कारणावरून दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या आशपलूस येथील जीवे ठार मारण्याच्या प्रकरणातून आई-वडिलांसह दोन मुलांची जामिनावर मुक्ततायाची फिर्याद फिर्यादी अंगत रामकिसन घुले यांनी पलूस पोलीस स्टेशन येथे दिली होती.


तदनंतर वर नमूद संशयित आरोपी मधुकर बापू सौदरमल , अमोल मधुकर सौदरमल ,सचिन मधुकर सौदरमल ,अरूणाबाई मधुकर सौदरमल यांना पोलिस येथील पोलिसांनी अटक केलेली होती. तदनंतर सदर आरोपींनी नियमित जामीन मिळवण्याचा मी सांगली येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टात जामीन अर्ज अॅड. सोमनिंग शावरसिद्ध पुजारी यांच्यामार्फत दाखल केलेला होता. यात आरोपीतर्फे अॅड. सोमनिंग पुजारी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने यातील आरोपी मधुकर बापू सौदरमल , अमोल मधुकर सौदरमल ,सचिन मधुकर सौदरमल ,अरूणाबाई मधुकर सौदरमल यांची जामिनावर मुक्तता केली आहे.


यात आरोपीतर्फे अॅड. सोमनिंग पुजारी , अॅड. सोनाली उघडे ,अॅड. आशिष कंटीकर ,अॅड. निदा सैफान यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड.देशपांडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply