Headlines

पंढरपूर शहरात १० दिवस लॉकडाऊन करा-शिवसेना

शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

पंढरपूर/नामदेव लकडे – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन अतिशय शिस्तबध्दपणे विविध उपायोजना करीत आहे.पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात संपुर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्या पासून आपण व आपल्या सर्व सहकार्‍यांनी प्रशासकिय पातळीवर योग्य त्या उपायोजना करण्याबरोबरच अहोरात्र परिश्रम करीत पंढरपूर शहर तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठे यश मिळवीले.मात्र जुन महिन्याच्या सुरुवातीस पंढरीत पहिला स्थानिक रहीवाशी कोरोना बाधीत आढळला आणि शहरात मोठया संख्येने कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे.हा प्रसार रोखण्यासाठी व संपर्क साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहरात किमान १० दिवसाचा लॉकडाऊन करावा अशा आशयाची मागणी शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 या बाबत अधिक माहिती देताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले कि, पंढरपुर शहरातील जवळपास सर्वच उपनगरात तसेच शहरातील प्रदक्षिणा मार्गावर कंटेनमेन्ट झोन तयार करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.तर शहरातील अर्तंगत भागातही अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.ही परिस्थीती अतिशय गंभीर वळण घेत असून दररोज रुग्णांचा वाढता आकडा पाहता जर वेळीच खबरदारी घेतली नाही तर शहरात समुह संसर्गाची परिस्थीती निर्माण होऊ शकते हे पाहता पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व कोरोना बाधीत व्यक्तींची संपर्क साखळी तोडण्यासाठी तातडीने किमान 10 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करुन शहरातील अती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करुन शहरात जनता कर्फ्युची घोषणा करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग सुधीर अभंगराव,शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख,शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे,शिवसेना उप शहर प्रमुख पोपट सावतराव,विनय वनारे,अविनाश वाळके,सचिन बंदपट्टे,लंकेश बुराडे,तानाजी मोरे,अमित गायकवाड,पंकज डांगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply