Headlines

पंढरपूर शहरात लॉक डाऊन आणि संचारबंदी लागू करा-प्रहार संघटना

पंढरपूर/नामदेव लकडे -कोरोंना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पंढरपूर शहरात दहा दिवस लॉकडाउन जाहीर करा.अशा आशयाचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने प्रांतधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की पंढरपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढतचं चालला आहे.पंढरपूर शहरालगतचं ग्रामीण भाग सुरु होतो त्यामुळे कोरोना जास्त प्रमाणात ग्रामीण भागात सुध्दा शिरकाव करु शकतो.त्यामुळे कोणत्याही राजकिय दबावाला बळि न पडता पंढरपूर शहरात दहा दिवसां करिता लॉकडाऊन जाहिर करा.यावेळि प्रहार सांघटनेचे तालुका प्रमुख संतोष मोरे,अपंग क्रांती जिल्हा सचिव संजय जगताप,पंढरपूर शहर अध्यक्ष गणेश ननवरे ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *