नोकरी हवीय.. मग ‘महास्वयंम’ वर नोंदणी करा

नोकरी हवीय.. मग ‘महास्वयंम’ वर नोंदणी करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर- लॉकडाऊनमुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांमुळे उद्योगांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि गरजूंना रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने ‘महास्वयंम’ वेबपोर्टल सुरु केले आहे. रोजगार देणारे आणि रोजगार मागणारे यांच्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. गरजूंनी ‘महास्वयंम’ वेबपोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सोलापूर जिल्ह्यातील विविध उद्योग क्षेत्रामधील कामगार स्थलांतरित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बळकटी देण्यासाठी ‘महास्वयंम’ https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदे, उमेदवारांची यादी, नियुक्तीबाबतची प्रक्रिया पूर्ण करता येते, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
या वेबपोर्टलच्या वापरातून सूक्ष्म, लघु ,मध्यम आणि मोठे उद्योग सर्व शासकीय व खाजगी आस्थापना निशुल्क कुशल/अकूशल मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे. अधिकच्या माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी ‘महास्वयंम’ वेबपोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, सोलापूरच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत काही अडचण असल्यास, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर, ड्राईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, पार्क चौक, (नॉर्थकोट) सोलापूर, येथे प्रत्यक्ष अथवा 0217-2622113 या क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेलदवारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply