Headlines

नाशिक महानगरपालिकेतील घंटागाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत महादेव खुडे यांचे आमरण उपोषण!

प्रतींनिधी /स्वप्नील भोईर – नाशिक पालिकेतील घंटागाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नाशिक पालिकेला सातत्याने निवेदन दिले ,परंतु  पालिकेने याबाबत कधीही याची  गंभीर दखल घेतली नाही.कामगारांना पूर्ण दिवस काम करुन किमान वेतन न देणे,हजेरी कार्ड,वेतनचिठ्ठी तसेच अत्यावश्यक सुविधा न पुरविणे….इ.प्रश्नांबाबत कामगारांना सातत्याने संघर्ष करावा लागत आहे.सिडको व पश्चिम भागातील सन.२०१६- १७ या कालावधीतील थकबाकी जवळपास १ कोटी रुपये आहे.२१ दिवसांच्या भरपगारी रजेचे पैसे २०११ पासून दिले नाहीत .पंचवटी भागातील २०१३ चे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नाही.कामगारांना १० तारखेच्या आत  वेतन द्यावे असे  कायद्याने बंधनकारक असताना ते कधीच देण्यात येत नाही.

 कामगारांना हजेरीकार्ड व वेतनचिठ्ठी मिळत नाही त्यामुळे पूर्ण दिवस भरुनही पूर्ण वेतन मिळत नाही.महापालिका यासंदर्भात कोणतीही कायमस्वरुपी व्यवस्था न करता हात झटकत राहते. पंचवटी व सिडको भागात यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कामगार थांबले असताना महापालिकेने तथाकथित ठेकेदाराच्या दबावाखाली कामगारांवर खोट्या केसेस टाकायला लावल्या.

    कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी महापालिका आयुक्त वेळ देत नाहीत. व पालिकेचे आरोग्य अधिकारी केवळ पत्रे देतात कारवाई करत नाही,तसेच पोलिसांनी २ वेळा आंदोलनाची परवाणगी नाकारली.त्यामुळे मी आजपासून संघटनेचे कार्यालय,राणेनगर,सिडको या ठिकाणी आज दिनांक २९ ऑक्टोंबर पासून “आमरण उपोषणा”ला बसत आहे.अशी महादेव खुडे उपाध्यक्ष नाशिक महानगरपालिका श्रमिक संघ यांनी ए.बी.एस.न्यूज च्या प्रतींनिधी शी बोलताना दिली.

सध्या पंचवटी व सिडको भागातील  ठेका नाशिक रोड भागातील तथाकथित ठेकेदार योगेश।गाडेकर या  माननीय नगरसेविका सत्यभामाताई गाडेकर यांच्या मुलाला दिला आहे.लोकप्रतिनीधी या नात्याने जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी गाडेकरताई आपल्या मुलासाठी सर्व कायद्यांना हरताळ फासून गुंडामार्फत कामगारांवर दबाव टाकत आहे,याबद्दल आयुक्तांनी कारवाई करण्याऐवजी उलट ते कामगारांवरच केसेस करायला सांगत आहेत.

    नाशिक पालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत घंटागाडी कामगारांनी कोरोना काळात अपु-या साधनांनिशी केलेल्या कामाचे कौतुक नगरसदस्याकडून करण्यात आले व त्याचवेळी महापालिका प्रशासनाने मात्र ठेकेदाराच्या दबावाखाली कामगारांवर ३५३ चे गुन्हे दाखल करायला लावले.शासकीय कामांत अडथळा असे खोटे रिपोर्टींग करण्यात आले.वस्तुतः कामगारांनी कामात कोणताही अडथळा आणला नाही व त्या दिवशी काही गाड्याखतप्रकल्पावर गेल्या तर काही गाड्या संबंधितांनी सांगितल्यामुळे दुस-या दिवशी गेल्या.सदर दिवसांचे दंड पाच ते सात हजार रुपये कामगारांच्या वेतनातून कापून घेण्यात आले.

  या कोरोना काळात कामगार अपु-या साधनांसह काम करत होते.एक कामगार कोरोनामुळे मृत्यु पावला  व कोरंटाईन केलेल्या काही कामगारांना या काळातील वेतन मिळाले नाही.या सर्व प्रश्नांचा सातत्याने सामना करणा-या कामगारांवर नगरसेवकाचा मुलगा असलेला ठेकेदार सातत्याने दबाव टाकत असून कामगार अक्षरशः जीव मुठीत घेवून काम करत आहेत.

   पोलिस कोरोनामुळे परवाणगी देत नाहीत व पालिका प्रश्न सोडवित नाहीत म्हणून आज दिनांक २९ ऑक्टोंबर २०२० पासून मी संघटनेच्या कार्यालयात,राणेनगर,हाॅटेल चंन्द्रलोक मागे,सिडको येथे आमरण उपोषणास सुरुवात करीत आहे.जोपर्यंत प्रश्न सुटत नाही,तोपर्यंत हे उपोषण चालू राहिल आपण या आंदोलनाला पाठींबा द्यावा ही विनंती महादेव खुडे उपाध्यक्ष नाशिक महानगरपालिका श्रमिक संघ यांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *