Headlines

नारायण चिंचोली मध्ये ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात परिचारक गटाकडून निवडणूक आढावा बैठक

 पंढरपूर /गणेश सुरवसे-नारायण चिंचोली येथे सोलापूर जिल्ह्याचे आमदार आदरणीय श्री प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेली ग्रामपंचायत नारायण चिंचोली येथे ग्रामपंचायत निवडणूक सन 2021 उमेदवार निवडी साठी पांडुरंग परिवाराची बैठक आयोजित केली होती.त्या मध्ये उमेदवार निवडी बाबत चर्चा झाली. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण तात्या धनवडे,सौदागर बापु गुंड, शिवाजीराजे भोसले,विजय कोळेकर, मारुती वाघमोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी सरपंच धर्मराज नलवडे, माजी उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण,दत्तात्रय मस्के सर, सोसायटी चे चेअरमन विष्णू माने,माजी सरपंच नितीन मस्के,माजी सरपंच विठ्ठल माने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *