Headlines

दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सा.म्हेत्रे प्रशालेचे दहावीचा निकाल १००%

दुधनी / जयकुमार सोनकांबळे : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सा.म्हेत्रे प्रशालेचे दहावीचा निकाल १००% टक्के लागला आहे. मार्च २०२० एस.एस.सी परीक्षेमध्ये एकूण ५९ विद्यार्थी बसले होते. यापैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्रावीण्य मध्ये १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कु. गिता प्रभु झळकी ( गुण ८५.८०टक्के ) द्वितीय क्रमांक उत्तम सातलिंग निबांळ (गुण ८४ टक्के ), तृतीय क्रमांक कु. लक्ष्मी रत्नप्पा गोटे (गुण ८३.२० टक्के) गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा.श्री शंकर अण्णा म्हेत्रे व सचिव श्री. प्रथमेश म्हेत्रे व सहसचिव श्री . महादेव खेडसर मुख्याद्यापक व सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिले.

श्री. एस्. जी. परमशेट्टी हायस्कूल, दुधनी. ता. अक्कलकोट
शाळेचा निकाल- 98.41%
दुधनी केंद्रात व शाळेत
१) कु. गंगा कत्ते – 93.60% – प्रथम
२) सुदीप हिळ्ळी – 93.40% – द्वितीय
३) कु. तृप्ती गंगावती – 93.20% तृतीय
४) रविचंद्र शिंगे – 93.20% – तृतीय
५) कु. सौंदर्या कलशेट्टी – 92.00% – चतुर्थ
६) कु. विजयलक्ष्मी हिरोळी- 90.40 % कन्नड माध्यमात प्रथम.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply