Headlines

दिशा शेख यांची तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर निवड

प्रतींनिधी – ( निखिल भाटे )  – सामाजिक कार्यकर्त्या आणि वंचित बहुजन आघाडी (VBA)च्या प्रवक्त्या   दिशा पिंकी शेख  यांची “महाराष्ट्र शासनाच्या” सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या “तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर” नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन !

दिशा पिंकी शेख यांची राजकारणात वाटचाल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरु केली.वंचित बहुजन आघाडीने सत्तेवर आल्यास  “तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते असं त्यांनी  बोलताना स्पष्ट केलं.अशाप्रकारचे अभिवचन देणारा वंचित बहुजन आघाडी पहिलाच पक्ष आहे.
                सत्तेत आला नसला तरी हे अभिवचन इतर पक्षाने पूर्णत्वास नेवून समाजातील एक घटक असणाऱ्या आणि गेली कित्येक वर्षे अस्तित्वासाठी झगडणाऱ्या, तृतीय पंथीयांना यामुळे नवी “दिशा” मिळणार आहे.हे नक्कीच.त्यामुळे या समस्त घटकांचे विशेष अभिनंदन आणि असे मंडळ स्थापन केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे सुद्धा अभिनंदन दिशा पिंकी शेख यांनी  याविषयी बोलताना यासाठी जमीन तयार करणाऱ्या  गौरी सावंत लक्ष्मी नारायण त्रिपाठी पहिल्या न्यायमूर्ती  सलमा खान यांचा आवर्जून उल्लेख करत आम्ही त्यांचे काम पुढे नेणार असल्याचे म्हणले आहे.

One thought on “दिशा शेख यांची तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *