Headlines

दिपक गाजरे यांची कक्ष अधिकारी पदी निवड

दिपक गाजरे यांचा सत्कार करताना चेअरमन कल्याणराव  काळे 


पंढरपुर / प्रतिनिधी ::- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC)मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भडीशेगाव येथील श्री.दीपक नवनाथ गाजरे यांची कक्ष अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन मा.श्री. कल्याणरराव काळे यांच्या शुभहस्ते  सत्कार करण्यात आला.

दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही जिद्द परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप पाठीवरती देऊन भविष्यकाळात येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व अडचणी सोडवण्यासाठी कायम बरोबर असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.यावेळी त्यांचे वडील श्री.नवनाथ गाजरे प्रतिष्ठीत नागरिक श्री.धनाजी कवडे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. बाळासाहेब काळे गुरुजी प्राचार्य एच. आर .जमदाडे सर प्राचार्य संतोष गुळवे सर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *