Headlines

दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍या मुख्याध्यापकाला शिक्षा द्या – एसएफआय

  

 सोलापूर/शाम आडम –   स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने मा. उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे साहेब यांना निवेदन देण्यात आले. 

 महाबळेश्वर येथील महिला दिनीच एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा एसएफआय सोलापूर जिल्हा समिती तीव्र निषेध करीत आहोत.

  शाळा व महाविद्यालय हा विद्यामंदिर आहे. शिक्षक आणि प्राध्यापक हे गुरू आहेत. असा समजल्या जाणाऱ्या विद्यार्थिनीवर एक गुरूच अशा प्रकारचा निर्घृण कृत्य करतोय. हि घटना अतिशय लाजिरवाणी वाटणारी घटना आहे. गुरूंनी अशा प्रकारचा कृत्य केल तर पालकांनी कोणावर विश्वास ठेवून विद्यार्थीनीना शाळा व महाविद्यालयाला पाठवणार. एकीकडे मुली जास्त प्रमाणात शिक्षणापासून वंचित आहेत. अशा घटनांमुळे मुली शिक्षणातून पूर्णपणे बाहेर फेकले जातील.

 

प्रत्येक शाळा व महाविद्यालयात लैंगिक छळ प्रतिबंधित समित्या गठीत करून त्या समिती मार्फत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात यावे. त्या मुख्याध्यापक नराधमाला कठोर शासन शिक्षा करण्यात यावे. अशा प्रकारच्या कृत्य करण्याचा प्रयत्न पुन्हा कोणी करणार नाही. आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कडक कायद्याची अंमलबजावणी करा. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आले.

 

महाबळेश्वर येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक दिलीप रामचंद्र ढेबे या नराधमाला कठोर शासन कारवाई तात्काळ करा. अन्यथा एसएफआय कडून संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आले.


 यावेळी एसएफआय जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, सहसचिव श्यामसुंदर आडम, मा. जिल्हा सचिव मीरा कांबळे, स.मं. सदस्य राहुल भैसे, जि. क. सदस्य अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, प्रशांत आडम इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *