Headlines

दलित महासंघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त अनोखा उपक्रम

गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींसह त्यांच्या माता पित्यांच्या देखील केला सन्मान
पंढरपूर/नामदेव लकडे- सत्यशोधक जगविख्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून दलित महासंघ पंढरपूर तालुका युवा आघाडीच्या वतीने कासेगाव मठवस्ती येथे इ 10 वी12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा व 10 वी 12 वी नंतर काय या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थित सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले व दलित महासंघ युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष  अमोल खिलारे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग खिलारे यांनी केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा डॉ.सचिन थिटे लाभले तसेच प्रमुख उपस्थिती दलित महासंघ युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष  मारुती नाईकनवरे ,विवेक वर्धिनीचे प्रा.लोणकर सिध्दार्थ अकॅडमी प्राध्यापक गजानन गायकवाड ,प्राध्यापक मोहिकर , मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव ,दौलतराव विद्यालयाचे सिनिअर प्राध्यापक भारत खिलारे ,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ .स्वप्नाली खिलारे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनर्स कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा अमोल खिलारे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांचे स्वागत करण्यात आले महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात फक्त विध्यार्थ्यांचाच नाही तर पालकांचा ही सन्मान करण्यात आला. यावेळी सत्कार स्वीकारताना काही पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तसेच आलेल्या विद्यार्थ्यांना  10वी 12वी नंतर कोण कोणत्या संधी मिळतील या विषयीचे मार्गदर्शन करण्यात आले .विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून  मराठा महासंघाचे संतोष जाधव यांनी शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे आयोजन केल्या बद्दल प्रा .भारत खिलारे यांनी युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल खिलारे व पांडुरंग खिलारे यांचे आपल्या मनोगतात अभिनंदन केले.
 तर युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल खिलारे यांनी आभार प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व पालकांना अशी ग्वाही दिली की , शिक्षण घेण्यास जर कोणाला आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर शिक्षण न थांबवता त्यांनी दलित महासंघ व माझ्याशी संपर्क साधा मी केव्हा ही आपणास मदत  करण्यासाठी तयार आहे अशी साद त्यांनी दिली व खऱयार्थी गरीब गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले.
 हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दलित महासंघाचे महादेव खिलारे , नितीन खिलारे, चंद्रकांत जाधव, स्वप्नील खिलारे, सचिन खिलारे, अशोक खिलारे, अनिकेत खिलारे, प्रशांत खिलारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *