Headlines

तब्बल सहा महिन्यापासून वाणीचिंचाळे येथील कृषी सहाय्यक पद रिक्त

पंढरपूर/नामदेव लकडे -वाणीचिंचाळे हे सांगोला तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गाव असल्यामुळे कायमस्वरूपी या गावातील नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यानां तोंड द्यावे लागत आहे.
 सध्या पावसाने समाधानकारक सुरुवात केल्याने सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पिके चांगली आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे मका, बाजरी ,फळपिके यावर अळ्या व रोग पसरत आहेत. परंतु याविषयी काही उपाययोजना करण्यात यावी यासाठी शासनाने कृषी सहाय्यक हे पद निर्माण केले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी हे अधिकारी असणे गरजेचे आहे परंतु अद्यापही पहिले कृषी सहाय्यक बदली होऊन तब्बल 6महिने झाले तरीही नवीन  व्यक्तीची नेमणूक करण्यात आली नाही. 
यामुळे शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना अशा भोगंळ कारभाराला सामोरे जावे लागत आहे.तसेच या कोरोनाच्या महामारीच्या काळात कृषी सहाय्यक हे ग्रामस्तरीय समीतीचे महत्त्वाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.तसेच यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या महामारीवर निर्णय घेण्यात महत्त्वाचा घटक आहेत परंतु या गावाला सध्या कृषी सहाय्यक पदाचे वावडे आहे का अशा जळजळीत सवाल गावातील सुज्ञ  शेतकरी करत आहेत.  
      
तसेच या पदाचा अजूनही कोणीही कृषी सहाय्यक पदभार का स्विकारत नाही हे काय गौडबंगाल आहे हा प्रश्न दबक्या आवाजात बोलला जात आहे.तसेच गावातील कृषी  सहाय्यक पदाची लवकरात लवकर नियुक्ती करून तालुक्याच्या कर्तव्यदक्ष कृषी अधिकारी दिपाली जाधव या वाणीचिंचाळे ग्रामस्थांना न्याय देतील अशी माफक अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *