Headlines

टोमॅटो पिकावरील नवीन तिरंगा विषाणूच्या टी.व्ही.-९ वरील दि.१५ मे, २०२० रोजीच्या बातमी बदल

महाराष्ट्र राज्यात टोमॅटो या भाजीपला पिकाची लागवड प्रामख्याने नाशिक,अहमदनगर,पुणे औरंगाबाद, नागपुर लातूर या जिल्हयात करण्यात येते. राज्यात टोमॅटो पिकाचे सर्वसाधारण क्षेत ३३९५० हेक्टर असुन त्यापासुन ८,४८,५५० मे.टन इतके उत्पादन मिळते.
अहमदनगर जिल्हयातील संगमनेर व अकोला या तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोवरील नवीन तिरंगा विषाणुजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त असल्याची बातमी मराठी वृत्त वाहिनी टी.व्ही -९ वर दि.१५ मे, २०२० रोजी प्रदर्शित करण्यात आली. या प्रकरणी केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागास नवीन विषाणुजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर जिल्हयातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत अशी शेतक-यांमार्फत तक्रार केली असल्याने दिसून आले. सदर प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्यासाठी राज्यस्तरावरुन क्षेत्रिय स्तरावरील कृषि विभाग व वनस्पती शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी यांना प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आलेल्या आहेत. डॉ.तानाजी नरुटे वनस्पती शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी, यांनी स्थानिकरित्या प्रसिध्द केलेल्या निवेदनामध्ये कोणत्याही वनस्पती मधील विषाणुचा मानसावर परिणाम होऊ शकत नाही मानसामधील व वनस्पतीवरील विषाणु हे वेगवेगळया प्रकारचे असुन एकमेकांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत, त्यामुळे सदर बातमी चुकीची असल्याचे वनस्पती शास्त्रज्ञाने निवेदन केले आहे आजपर्यंत वनस्पतीवर परिणाम करणारे कोणत्याही वनस्पती विषाणुचा मनुष्यावर परिणाम झालेला नाही. राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी व ग्राहक यांनी टोमॅटो वरील नविन विषाणुजन्य रोगाबाबत निराधार व धडकी भरवणारी बातमी चुकीची असल्याने टी.व्ही-९ या चॅनलने सदरची बातमी मागे घेतली आहे. राज्यातील टोमॅटो उत्पादकांना भविष्यात अडचणी उदभवू नयेत यासाठी कृषि विभागाने अहमदनगर जिल्हयातील टोमॅटो प्रादुर्भावग्रस्त तालुक्यामधुन टोमॅटोची पाने, फळे, फांदी , मुळे व बियाणाचे नमुने राष्ट्रीय फलेात्पादन संशोधन संस्था हिस्सारगटटा बेंगलोर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.तरी राज्यातील टोमॅटो उत्पादक व ग्राहकांनी या पिकावरील विषाणु रोगाबाबत प्रसिध्द झालेली बातमी व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन श्री शिरीष जमदाडे , संचालक फलोत्पादन, कृषि आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.

Leave a Reply