Headlines

ज्येष्ठ नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना भारत ज्योती अवार्ड पुरस्कार प्रदान

सोलापूर /शाम आडम  –  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून गेली सहा दशके शेतकरी-कामगार, मध्यमवर्गीय, महिला,विद्यार्थी,युवकांच्या प्रश्नांना घेऊन न्याय हक्काची लढाई करता करता संघर्षाच्या जोरावर कष्टकरी महिला विडी कामगारांना परवडणाच्या दरात आणि  केवळ नाममात्र शुल्कात सहकारी तत्वावर घर मिळवून देण्याचा जागतिक ऐतिहासिक कार्य विक्रम कॉ.आडम मास्तरांच्या नावे लिखित झालेला आहे. आजपर्यंत कॉ.आडम मास्तरांना अनेक राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले असून त्यात आणखी भर इंडिया इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोसायटी या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेकडून  ज्येष्ठ नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना आर्थिक विकास व राष्ट्रीय एकीकरण साठी भारत ज्योती अवार्ड पुरस्कार देऊन भर  टाकण्यात आली. याचे वितरण 9 एप्रिल 21 रोजी नवी दिल्ली येथील लोधा गार्डन येथे दुपारी 2 वाजता करण्यात येण्यात आहे. ही कामगार चळवळ आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब  असल्याची माहिती माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांनी दिली. 

ते अधिक माहिती देताना पुढे म्हणाले की, आजपर्यंत हा पुरस्कार आजमितीला मदर तेरेसा, उपराष्ट्रपती जत्ती, विविध राज्याचे राज्यपाल, नामांकित शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ,  क्रीडापटू,सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, राजकीय व्यक्तिमत्व यांना प्रदान करण्यात आले.यंदा हा बहुमान कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना मिळालेला आहे. यास्तव कष्टकरी कामगार आणि विविध राजकीय पक्ष ,सामाजिक संस्था, नागरी समूहाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *