Headlines

जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न प्रकरणातील दोघांचा जामीन मंजूर

सांगली:ऊसतोडीचा राग मनात धरुन महादेव अश्रुवा बडे यास नितीन मधुकर – सौदरमल व शिवाजी सुभाष गवई उर्फ गवळी यांच्यासह अन्य चौघांनी लाथाबुक्क्याने व ऊसाच्या कोयत्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या प्रकरणातुन या दोघांचा जामीन सांगली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पोतदार साहेब यांनी मंजुर केला आहे.

यात हकीकत अशी की,महादेव अश्रुबा बडे यास वर नमुद संशयित आरोपी नितीन मधुकर सौदरमल, शिवाजी सुभाष गवई उर्फ गवळी उसतोडीच्या कारणावरुन दिनांक २८/०२/२०२१ रोजी कोयत्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या आशयाची फिर्याद अंगद रामकिसन घुले यांनी पलुस पोलीस ठाण्यात दिली होती.

दरम्यान संशयित आरोपी नितीन मधुकर सौदरमल शिवाजी व सुभाष गवई उर्फ गवळी यांना पलुस येथील पोलिसांनी अटक केली होती.संशयीत आरोपींनी नियमित जामीन मिळवण्याकामी सांगली येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टात जामीन अर्ज ॲड.सोमनिंग शावरसिध्द पुजारी यांच्यामार्फत दाखल केलेला होता. यात आरोपीतर्फे ॲड.सोमनिंग पुजारी यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन में न्यायालयाने यातील संशयित आरोपी यांची जामीनवर मुक्तता केलेली आहे.

यात आरोपीतर्फे ॲड.सोमनिंग पुजारी,ॲड.सोनाली उघडे,ॲड. अभिषेक देवकते,ॲड.पल्लवी कांते यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. देशपांडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply