जीपीएस द्वारे मोजणी करून कब्जात असलेल्या जमिनी आदिवासींच्या नावे करावी – आमदार विनोद निकोले

विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत राज्यपालांकडे जोरदार मागणी

मुंबई / डहाणू. (स्वप्नील भोईर ) – ज्या जमिनी आदिवासी समाज कसत आहे व त्यावर त्यांचा कब्जा आहे अशा जमिनी जीपीएस द्वारे मोजणी करून आदिवासींच्या नावे करावीत अशी जोरदार मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झालेल्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, पालघर जिल्हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो अशात केंद्र सरकारचे प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, सुपरफास्ट हायवे, कोस्टल हायवे असे अनेक प्रकल्पात आदिवासींच्या भागातून जात आहेत अशा परिस्थितीत आदिवासी समाज भूमीहीन होत आहे त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी आदिवासी समाज जमीन गेली 30 – 40 वर्षांपासून जमीन कसून आपले उदरनिर्वाह करत आहेत अशा सर्व आदिवासींच्या जमिनी जीपीएस द्वारे मोजणी करून आदिवासींच्या नावे करावी अशी मागणी केली असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लवकरात लवकर राज्य शासनाच्या आधिकऱ्यांकडून विशेष बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply