Headlines

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

 

मेष : मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवस जाईल 

वृषभ : घरातील कामांमध्ये व्यस्त  व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल.

मिथुन : बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा.

कर्क : आवडी निवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.

सिंह : प्रेमींना  व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो.

कन्या : स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल. 

तूळ : उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे. 

वृश्चिक : आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.

धनु : धार्मिक गोष्टीत दिवस घालवल . वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल. 

मकर : कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंद दायक असेल.

कुंभ : मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.

मीन : आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाता-पायांची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.

24 ऑक्टोबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *