Headlines

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील.

2. वृषभ : अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल. राजकीय स्पर्धक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील.

3. मिथुन : चंचलतेला आवर घाला. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनात उगाचच शंका निर्माण होतील.

4. कर्क : तुमची बौद्धिक तपासणी केली जाऊ शकते. जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल.

5. सिंह : आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मित्रांशी सलोख्याच्या गप्पा होतील. भाग्याची भक्कम साथ मिळेल.

6. कन्या : मोठी खरेदी केली जाऊ शकते. अभ्यासात कमी पडू नका. आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल. सहकारी कामात मदत करतील.

7. तूळ : जोडीदाराचा स्वभाव ओळखून उत्तर द्या. काही बाबी स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. जुगारातून धनलाभ संभवतो.

8. वृश्चिक : शैक्षणिक गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कर्तुत्वाला चांगला वाव आहे.

9. धनु : तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका.

10. मकर : तुमच्यातील न्यायीपणा उपयोगी पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीत सावधानता बाळगावी. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा.

11. कुंभ : तुमच्यातील सद्गुणांची वाढ होईल. तडकाफडकी कामे करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्या. घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल.

12. मीन : घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. उतावीळपणे खर्च करू नका. एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. भावनेला आवर घालावी लागेल.

11 सप्टेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *