जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

मेष : नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

वृषभ : पैशाचा वापर विचारपूर्वक करावा. मोठा निर्णय घेताना एकवार पुन्हा विचार करावा. मित्रांच्या भेटीचे योग.

मिथुन : आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. तुमच्या कृतीला विरोध होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.

कर्क : अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. दूरचे प्रवास संभवतात. ईश्वरावरील श्रद्धा दृढ होईल.

सिंह : आजचा दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला नवीन अनुभवाला सामोरे जावे लागेल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.

कन्या : नानाविध रंगांनी भरलेला दिवस. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. आहारावर नियंत्रण हवे.

तूळ : ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.

वृश्चिक : आजचा दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुरळीत पार पडतील. मुलांची चिंता सतावेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.

धनु : कलेत प्राविण्य मिळवाल. आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न होईल.

मकर : योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. काही वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

कुंभ : मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. दिवसाचा उत्तरार्ध दिलासादायक असेल.

मीन : बोलताना पुढच्या-मागच्या गोष्टीचा विचार करावा. लाभाच्या संधी प्राप्त होतील. मानसिक स्वास्थ्य जपावे.

28 ऑक्टोबर 2020

Leave a Reply