जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : कामामध्ये अतिदक्षता बाळगा. आपल्या विचारांशी ठाम रहा. इतरांना मदत करून समाधान मिळेल. कार्यक्षेत्रात झालेला बदल स्वीकारावा लागेल.
2. वृषभ : आपण हातात घेतलेले काम पूर्ण होईल. इतरांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल.
3. मिथुन : आपला निर्णय इतरांवर लादू नका. उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.
4. कर्क : अडकलेली येणी वसूल होतील. समोरच्या व्यक्तीचा आदर करावा. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. अपचनाचा त्रास संभवतो.
5. सिंह : नवीन गोष्टींचे दडपण घेऊ नका. आपला आत्मविश्वास जागृत ठेवावा. मुलांच्या जबाबदार्‍या सक्षमतेने पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
6. कन्या : कामाचा आधी संपूर्ण अभ्यास करावा. गरज वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. चांगल्या गोष्टींसाठी झालेला खर्च मन प्रसन्न करेल.
7. तूळ : मनातील विचार इतरांना बोलून दाखवा. अडचणीच्या काळात मनातील व्यक्ती साथ देईल. उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल.
8. वृश्चिक : ठामपणे आपले विचार मांडाल. कोणाच्या दडपणाखाली राहू नका. आर्थिक बाजू भक्कम होईल. सन्मानात वाढ होईल.
9. धनु : तुमचा सल्ला लोक विचारात घेतील. काम अधिक वेळ ताणू नका. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. जवळचा प्रवास घडेल.
10. मकर : नवीन कार्य करण्याची तयारी दाखवाल. तुमच्या कामात कुशलता दिसून येईल. व्यवसायिकांना अनुकूल दिवस. वाहन चालवताना सावध राहावे.
11. कुंभ : अवघड गोष्टीत अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा. दिवस धावपळीचा राहील. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल.
12. मीन : कोणत्याही कामाचा तिटकारा करू नका. मनाची व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराचा पाठिंबा राहील.
30 सप्टेंबर 2020

Leave a Reply