Headlines

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणवादी योद्धा अनिल अगरवाल यांना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची आदरांजली

क्रांती स्मृतीवनात ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते भाई संपतराव पवार यांचा केला सत्कार व वृक्षारोपण

सांगली/विशेष प्रतिनिधी- 5 जून जागतिक पर्यावरण दिन ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र’या सामाजिक संघटनेने अनोख्या पद्धतीने साजरा केला.महाराष्ट्रातील ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते,क्रांती स्म्रतीवनाचेे निर्माते भाई संपतराव पवार यांची प्रत्यक्ष क्रांती स्मृती वनात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट घेतली आणि त्यांचा भावपूर्ण सत्कार केला व वृक्षारोपण केले.तसेच भारतातील पर्यावरण चळवळीच्या माध्यमातून अनेक वर्षे या देशाला दिशा देण्यात योगदान दिलेले, 1973 साली स्टाँकहोम येथील पहिल्या जागतिक पर्यावरण रक्षण परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित राहून वार्तांकन केलेले, भारतात येऊन पर्यावरण रक्षण चळवळीच्या माध्यमातून अनेक अहवाल सरकार दरबारी सादर केलेले, ज्यांच्या अहवालांची नोंद सर्वोच्च न्यायालयाने घेतली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारनेही ज्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कामाची दखल घेतली व पर्यावरणरक्षणासंबंधी अनेक चांगले निर्णय घेतले ते योद्धा पर्यावरणवादी अनिल अगरवाल.स्वतः पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या काळात या पर्यावरण वादी नेत्याला भारताच्या दोन्ही संसद सभागृहासमोर भाषणासाठी आमंत्रित केले होते. असे थोर पर्यावरणवादी योद्धे अनिल अगरवाल यांना आदरांजली वाहून त्यांच्या आठवणींचा जागर आज क्रांती स्मृतीवनात करण्यात आला.

यावेळी बोलताना पर्यावरणवादी,पाणी चळवळीचे भाई संपतराव पवार म्हणाले की पर्यावरण रक्षणाबाबत अवघे जग अस्वस्थ आहे.तेव्हा पर्यावरण रक्षणाचा लढा हा सरकारच्या आर्थिक धोरणाशी निगडित असलेला लढा असून भारतातील गरिबी संपवायची असेल, लोकांचे जीवनमान उंचवायचे आणि आयुर्मान वाढवायचे असेल तर पर्यावरण रक्षणासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करायला पाहिजेत असे अनिल अगरवाल यांनीही म्हटले होते. अशा पर्यावरण वादी योद्ध्याला इथे क्रांतीस्म्रतीवनात जागतिक पर्यावरणदिनी आदरांजली वाहण्याचा योग आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडने घडवून आणणे हे मी माझे क्रांती स्मुर्ती वनाचे एक मोठे भाग्य समजतो. तसेच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र सारखी संघटना मानवमुक्तीच्या विविध लढ्यात सक्रिय भूमिका बजावत असून पर्यावरण रक्षणासाठी संघटनेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.याचा विशेष आनंद होतोय.

यावेळी बोलताना ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे,नाट्य अभिनेते प्रा.मनोज गवळी, काँ.वैभवराज शिरतोडे, विलास होवाळ,लक्ष्मण शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरण संरक्षण ही समाजाची सामुदायिक जबाबदारी असून निसर्ग संसाधने याचा सूनियोजित वापर करावा यासाठी प्रबोधनाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. या अनोख्या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ब्रिगेडचे सोशल मिडीया प्रमुख महेश मदने यांनी केले तर आभार व समारोप ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव यांनी केले. यावेळी विक्रमसिंह शिरतोडे, वरद मलमे ,विशाल शिरतोडे ऋतुराज शिरतोडे यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply