Headlines

जलसंजीवनी प्रकल्पांतर्गत अभ्यास सहल संपन्न

बार्शी: कृषी विकास वा ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकपुर, युनायटेड वे मुंबई आणि जॉन डीअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने यावली, रस्तापूर ,सुरडी ,उंडेगाव आणि इर्ले या पाच गावांमध्ये जलसंजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी कोरडवाहू फळबाग लागवडीकरिता प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना कोरडवाहू फळबाग लागवडीसाठी चे महत्व, प्रक्रिया उद्योग,पाण्याचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील असणारा वाव याबाबत शेतीशाळे मध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जलसंजीवनी प्रकल्पांतर्गत वरील पाच गावांमधील प्रति गाव दोन शेतकरी यांना सिताफळ लागवड करण्यासाठी प्रत्येकी एका एकर साठी 340 रोपे देण्यात आली आहेत. असे एकूण 10 शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या माध्यमातून तीन हजार चारशे रोपे देण्यात आली आहेत. यातून पाच गावातील दहा एकर क्षेत्र कोरडवाहू फळबाग लागवडीखाली आले आहे. सदरील शेतकऱ्यांना सिताफळाचे लागवड तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी भारतातील सर्वात मोठी सीताफळाची नर्सरी मधुबन नर्सरी गोरमाळे तालुका.बार्शी जिल्हा.सोलापूर येथील सर्व शेतकऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना रोपांची निवड, जमिनीची निवड, लागवड अंतर,किड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन ,काढणीपश्चानत घ्यावयाची काळजी आणि मार्केटिंग या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन डॉ. नवनाथ कसपटे यांच्याकडून देण्यात आले मार्गदर्शनानंतर प्रत्यक्ष नर्सरीत उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रजातींच्या सिताफळ बागांना भेट देण्यात आली. यातून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या प्रत्यक्षरीत्या पाहणी केल्यानंतर निवारण करण्यासाठी निर्धारित वेळ देण्यात आला.

शेतकऱ्यांना नगदी पिकाबरोबर पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी फळबागेकडे वळणे गरजेचे आहे. सदर प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या की उसाच्या शेतीपेक्षा सिताफळ लागवड करून योग्य ती जोपासना केल्यानंतर ऊस या पिकाच्या उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन सीताफळ बागेतून होऊ शकते तसेच पाण्याची बचत होऊन इतर हंगामी पिकांना याचा उपयोग होऊ शकतो.

वेळोवेळी शेतकऱ्यांना शेतीशाळा आणि अभ्यास सहली च्या माध्यमातून होणाऱ्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी जलसंजीवनी प्रकल्पातून होत असलेल्या अशा उपक्रमा च्या फायद्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. या अभ्यास सहली चे आयोजन जलसंजीवनी मार्फत प्रकल्प अधिकारी श्री समीर शेख ,अनुराधा गायकवाड आणि मोहसीन शेख यांनी केले होते.

Leave a Reply