Headlines

छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती वडाची झाडे लावून साजरी करण्यात

 

सांगोला – आज वाणीचिंचाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीच्या निमित्ताने गावातील युवकांनी 5 वडाची झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

     सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन गावातील मान्यवरांच्या हस्ते व मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता सामाजिक उपक्रम राबविण्यात येण्याचे ठरवले यानुसार गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात,महादेव मंदिर परीसर व प्रगती विदयालय या परीसरात हि वडाची झाडे लावून त्याची जबाबदारी अनिरुद्ध पाटील, रोहीत पवार, दादा काशीद ,यांच्या कडे महादेव मंदिराच्या परीसरातील झाडांचे संगोपन करणे.तसेच प्राथमिक शाळेच्या आवारातील बापुद्दीन शेख,नवनाथ गायकवाड, अमीत सावंजी,अभिजीत गायकवाड, सुरेश झाडबुके, अक्षय पवार यांच्या कडे देण्यात आली. तर प्रगती विदयालय परीसरातील झाडाचे संगोपन सचिन गायकवाड, कैलास गडहिरे, अक्षय वाळके,जालींदर पवार, विनोद निळे ,संभाजी केंगार यांच्या कडे देण्यात आले.

    या माध्यमातून फक्त खड्डा तोच  फक्त झाड व मान्यवर बदल न होता हे लावलेली झाड जगविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत.तसेच सध्या पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे म्हणून या युवकांनी आखलेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. तसेच गावात यापुढे प्रत्येक महापुरुषांच्या जंयतीच्या निमित्ताने 5 देशी झाडे लावण्यात येणार आहेत.

      यावेळी गावातील अशोक गंगाधरे, संपत शिंदे, देठे, विनोद गडहिरे, अमोल पवार, बंडू लांडगे, अनिल खरात,जगन्नाथ करडे,राजेंद्र पवार, गायकवाड, नामदेव घुणे,जितेंद्र गडहिरे, संभाजी केंगार,समाधान झाडबुके,सचिन सोपे, अमोल गडहिरे, सुकदेव जावीर,दगडु जाधव,प्रफुल्ल गडहिरे, अनिरुद्ध पाटील, सचिन गायकवाड, अभिजित गायकवाड, अमोल पवार, महादेव सुरवसे,यांच्यासह गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *