Headlines

घराची सजावट स्वस्त आणि मस्त

कितीही महागडे कपडे किंवा कोणतीही वस्तू सतत वापरून आपल्याला त्यांचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे मग आपण दिवसभर ज्या घरात राहतो त्या घरातले वातावरण बदल ही तेवढेच गरजेचं असत. आपल्या घराला नवीन लुक देने हा आपल्याला नेहमीच खर्चिक आणि वेळखाऊ काम असे वाटते पण ते तस नक्कीच नाही, आता आपण घराला कमी खर्चिक आणि कमी वेळात होणाऱ्या काही गृहासजावटीच्या टिपा देणार आहोत.
दरवर्षी घराची सजावट बदलणं नक्कीच गरजेच नाही पण आपण दार २ वर्षांनी तर हे काम करूच शकतो. यात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा भाग म्हणजे भिंती त्या आपण ५ ते ७ वर्षानंतर रंगरंगोटी साठी काढतो ते एक खर्चिक काम आहे हे काम आपण एकदाच कराव आपल्या घरातील भिंती ह्या शक्यतो पांढऱ्या ठेवण्याचा प्रयत्न असू द्या कारण पांढरा रंग घराला नेहमीच ताजा टवटवीत वातावरण देत असत. घरातील प्रकाश योजना वाढवण्यासाठी ही पांढऱ्या रंगाचा चांगला वापर होतो, तसेच कोणत्याही रंगासोबत जुळवून घेण्यासाठी सोप जाते.
आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या घरातील प्रकाश योजना आपल्या घरात भरपूर प्रकाश नसेल तर ते भकास वाटते त्यामुळे नेहमीच प्रकाश पाहिजे त्यासाठी चांगल्या प्रकारचे दिवे किंवा सुंदर घरी बनवलेलं कंदील सुद्धा आपण वापरू शकतो. दिवे हे आपल्या घरातील केंद्रबिंदू असतो.
त्यांनतर आपण वळूया फर्निचर कडे फर्निचर हे गर्जेपुरतेच असू द्यावे भरगच्च फर्निचर न ठेवता खोलीला शोभेल एवढंच ठेवावे. बैठकीची व्यवस्था करताना बैठकीच्या खाली सुंदर असा गालिचा अंथरावा जेणेकरून आपल्या फरशी ला नवीन लुक देण्यास मदत करतो.

आता आपण काही कलात्मक छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आपल्या खोलीला छान सुंदर रूप देऊ शकतो ते बघूया
खोलीच्या भिंतीवर आपण घरीच बनवलेल्या छायाचित्र रचना करून लावू शकतो तसेच आपण छोट्या रोपट्यांच वापर करून आपल्या खोलीला ताज आणि नैसर्गिक लुक देऊ शकतो, रोपटे लावल्याने आपण निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि घरात सकारात्मकता राहण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे आपण काही छोट्या छोट्या गोष्टींचा रंग बदलून आपल्या घराला नवीन लुक देऊ शकतो जस की उश्यांचे आच्छादन, खिडक्यांचे पडदे, खोलीतील एका भिंतीला वेगळा रंग. 
तसेच अश्याचं छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आपल्या खोलीचं रूप बदलू शकतो, जस की खोलीत एखादी पुस्तकांची कपाट बनवून भिंतीवर लावणे, खोलीत छान असा आरसा लावणे, एखादी सुंदर मूर्ती ठेवणे जेणेकरून आपल्याला ते बघायला कंटाळा न येता प्रसन्न च वाटेल. अश्या प्रकारे आपण खूपच कमी खर्चात आपल्या घराला छान आणि सुंदर लुक देऊ शकतो.
                                                                                                        लेखन –  कोयल कुणाल गरुड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *