Headlines

गुळपोळीत एकल गरीब 21 कुटूंबाना धान्य किटचे वाटप

प्रतिनिधी – लाॅकडाउनचा चौथा टपा सुरू आहे सगळ काही ठप्प झाले असलं तरी माणुसकीचा झरा अविरतपणे सुरूच आहे. कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी ‘घासातला घास’ या उपक्रमा अंतर्गत आपल्या गूळपोळी गावातीलच गरीब  एकल कुटूंबाना नेहरू युवा मंडळ,नेहरू युवती मंडळ ,भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय, शिवतेज मंडळ  ,भैरवनाथ ग्रामविकास मंडळ , भैरवनाथ ग्रामीण पतसंस्था या मंडळाच्या वतीने  धान्य किटचे वाटप करण्यात आले.

        गूळपोळी गावातील गरजूंना वाटप केलेल्या या किटमध्ये 5 किलो तांदूळ ,5 किलो गहू ,1 लिटर तेल, 2 किलो बटाटे , 100 ग्रॅम चहा, 1 किलो साखर, 100 ग्रॅम चटणी याचा समावेश आहे.
     आपल्या परिसरातील एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही याची दक्षता आपण घेऊयात आपण सर्वजण कोरोना विरोधात लढू आणी जिंकू देखील. या वेळी मंडळाचे अध्यक्ष व रुग्ण हक्क परिषद बार्शी तालुक्याचे अध्यक्ष  सूर्यकांत गोविंद चिकणे, गुलाब शेख, शहाजी चिकणे, अल्ताफ शेख.आप्पा चौधरी रेखा चिकणे, सुनीता चौधरी विद्या पाटील,व चंद्रकांत बारवकर, शिवाजी चिकणे, अतुल चिकणे ,रवींद्र गायकवाड,रामहरी काळे,विशाल पवार,सुरज पवार यांनी गावातील एकल कुटूंबाना घरोघरी जाऊन धान्य किटचे वाटप करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *