Headlines

गुजरात दंगल – जाकिया जाफरी यांच्या याचिकेवरील सुनावणी टळली



दिल्ली/वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने 2002 च्या गुजरात दंगली मध्ये मारल्या गेलेल्या काँग्रेस आमदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांच्या याचिकेवरील सुनावणीला पुढील दोन आठवड्यासाठी मंगळवारी स्थगिती दिली.


2002 च्या गुजरात दंगली मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व उच्च पदस्थ अधिकारी यांना  क्लीन चिट देणाऱ्या एस.आई.टी च्या अहवालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.


न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या विनंतीनुसार सुनावणी टाळली.


गुजरात मधील गुलबर्ग हाउसिंग सोसायटी हत्याकांडामध्ये मारले गेलेले काँग्रेस आमदार एहसान जाफरी यांच्या पत्नी एसआईटीच्या अहवालाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. 2002  मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या सांप्रदायिक दंगली भडकवण्यामध्ये  राज्याच्या अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचे नाकारले गेले होते.

गुजरात उच्च न्यायालयाने 5 ऑक्टोंबर 2017 ला जाकिया जाफरी यांची याचिका खारीज केली होती. त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *