Headlines

कोरोना लढ्यातील मृतांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा- संतोष घोडके

तुळजापूर/अक्षय वायकर::- कोरोनाच्या युध्दात आपले कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या पोलीस,डाँक्टर व आरोग्य कर्मचारी यांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी नंदगाव गटाचे युवासेनेचे विभागप्रमुख संतोष घोडके यांनी मुख्यमंत्र्यांकडे  केली आहे.

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्स , आरोग्य कर्मचारी,पोलीस,सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत आहेत.कोरोना विषाणूशी धैर्याने लढा देत आहेत,त्यांच्या या देशाप्रती प्रमाणिक सेवेची योग्य दखल घेऊन हि देश सेवा बजावत असताना ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आशा योध्याना शहीद घोषित करण्यात यावे व त्यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा .त्यांच्या कुटूंबाला शहीदांच्या कुटूंबाप्रमाणे सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. अशी मागणी नंदगाव गटाचे युवासेना विभागप्रमुख मौजे सिंदगाव येथील युवा नेतृत्व संतोष घोडके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इमेल निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर निर्णय जाहिर करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *