Headlines

कोरोना प्रतिबंधासाठी डीपीसीमधून चार कोटी 15 लाख रुपये मंजूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

        सोलापूर दि. 14 : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून आर्थिक वर्ष 2020-21मधून  चार कोटी 15 लाख 20 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत एक कोटी 37 लाख 56 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात 7 कोटी 45 लाख रुपये निधी देण्यात आला होता.
         कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच उपाय योजना करण्याकरिता सोलापूर महापालिकेसाठी दोन कोटी तीन लाख दोन हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 1 कोटी 4 लाख 18 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांच्यासाठी 1 लाख 25 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना 32 लाख 13 हजार रुपयांचा निधी  वितरित करण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय साठी एक कोटी 78 लाख 80 हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, तो  लवकरच वितरित केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
        जिल्हा नियोजन समितीच्या 2019-20 या आर्थिक वर्षातून एकूण सात कोटी 45 लाख तीस हजार रुपये निधी देण्यात आला आहे. ‘कोविड19’ रुग्णालय व यंत्रसामुग्रीसाठी दोन कोटी 70 लाख 69 हजार रुपये निधी देण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय करिता सामग्री साठी जिल्हा शल्यचिकित्सक  यांना दोन कोटी चार लाख 53 हजार रुपये निधी देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याकरिता औषधे व कामगिरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दोन कोटी 54 लाख 64 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी औषधाकरिता तीन कोटी 28 लाखांचा सहाय्यक अनुदान निधी देण्यात आला आहे. मूल्यमापन व संनियंत्रणासाठी होमगार्डकरिता 12 लाख 16 हजारांचा निधी देण्यात आला आहे.
        याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपयोजना करण्याकरिता पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून दोन कोटी 65 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. यामधून दोन कोटी 57 लाख दहा हजार 710 रुपये खर्च झाला आहे. यातून महापालिका आयुक्त, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभागांना निधी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *