Headlines

कारी येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न

उस्मानाबाद /आसिफ मुलाणी – उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाला. कारी ग्रामपंचायतचे ध्वजारोहण गावच्या प्रथम नागरिक मंजुषा करळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील शहीद जवान भागवत जाधव यांच्या प्रतिमा फलकाचे पूजन करण्यात आले. 
तलाठी कार्यालय येथील ध्वजारोहण तलाठी पवार व गावच्या पोलिस पाटील अमृता माळी, जि प प्रा शाळेचे ध्वजारोहण गावच्या उपसरपंच अंजुम सय्यद,श्री शिवाजी विद्यालय व शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक महावीर भुसारे,छत्रपती शिवाजी महाराज इंग्लिश स्कूल, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कारी, गायकवाड वस्ती शाळा याठिकाणी  ही ध्वजारोहणसोहळा संपन्न झाला. 
यावेळी कारी गावच्या सरपंच मंजुषा करळे, उपसरपंच अंजुम सय्यद,पोलिस पाटील अमृता माळी तलाठी पवार, तंटामुक्तसमितीचे अध्यक्ष संजित डोके ,मुख्याध्यापक जाधवर,माजी सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, आरोग्य सेविका, आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *