Headlines

कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल बळीराजाचा सन्मान

कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल बळीराजाचा सन्मान


 ओम कृषी सेवा केंद्राचा स्तुत्य उपक्रम 



सांजा :- 

येथील 70 वर्षीय शेतकरी जीवन निवृत्ती सूर्यवंशी यांनी 35 गुंठे मध्ये पावसाळी कांद्याचे तब्बल 11 टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. उतरत्या वयातही ते जिद्दीने मेहनत करून शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. या वर्षी त्यांनी ओम कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी कांद्याची लागवड केली होती व त्यामध्ये त्यांनी अपेक्षित उत्पन्न पण मिळवले.


 याबद्दल बांधावर शेतकरी मेळावा आयोजित करून त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद पंचायत समिती चे उपसभापती श्री आशिष नायकल उपस्थित होते तसेच पी.आय.कंपनीचे श्री तोडकर ,नेचर केअर फटिऀलायझसऀ चे श्री कांबळे,  सिंजेंठा कंपनीचे श्री जाधव , शिवार फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री अशोककुमार कदम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .


 शेतकरी बांधवास कांदा-ऊस पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले व सगळ्यांच्या अनुभवाची देवाणघेवाण करण्यात आली. यावेळी गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *