Headlines

कळंबवाडीत गरजूंना किराणा मालाचे वाटप

बार्शी- शहिद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी बहुउद्देशीय संस्था कळंबवाडी (पान) आयोजित स्व. कृतिका राजेंद्र गोसावी यांच्या व्दितीय पुण्यतिथि निमित्त 51 कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आला. यावेळी कार्यकमास प्रमुख पाहुणे अतुल खुपसे पाटिल ,सरपंच भाग्यश्रीदेवी गोसावी उपस्थित होते. कोरोना काळात लोकांची कामाअभावी होत असलेली फरफट पाहुन संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर गोसावी यांनी गरिब कुटुबांची निवड करुन त्यांना महिनाभर पुरेल इतका किराना बाजार दिला.

यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद गोसावी, खजिनदार लक्ष्मण गोसावी, , दत्तात्रय गोसावी, विवेक गुळवे, संतोष पौळ, आबा जाधव, लक्ष्मण पौळ, कुबेर जाधव, संतोष जाधव मेजर पवारसाहेब, मेजर कापसेसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते .कोरोना महामारीच्या काळात सोशल डिस्टस्नचे पालन करून, मास्क वापरुन कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *