“कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे या प्रशालेस सीबीएसई दिल्ली बोर्डाची मान्यता प्राप्त”

संलग्नता सर्टिफिकेट स्विकारताना प्राचार्य, श्री शिबा नारायण दास, आ.प्रशांत परिचारक, विद्यानिकेतनच्या प्राचार्या, सौ.शैला कर्णेकर , श्री रोहन परिचारक व श्री गणेश वाळके

गुरुकुल पद्धतीप्रमाणे कृतीयुक्त शिक्षण देण्याचा प्रशालेचा मानस आहे-आ.श्री प्रशांत परिचारक
पंढरपूर/नामदेव लकडे ::शेळवे येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने मौजे शेळवे येथे सुरू केली आहे. प्रशालेने सादर केलेला प्रस्ताव मंजूर करून केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली यांनी “कर्मयोगी पब्लिक स्कूल” या प्रशालेस केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी लागणारे मंडळ संलग्नता प्रमाणपत्र नं.११३०९७५ दि.२८.०६.२०२० रोजी प्राप्त झाले.

सीबीएसई शाळा मान्यतेसाठी प्रशालेने सर्व बाबींची पुर्तता केली असल्यामुळे प्रशालेस मिळाली आहे असे प्रशालेचे प्राचार्य, श्री शिबा नारायण दास म्हणाले. ३० एकराच्या या परिसरामध्ये सर्व सोईंयुक्त व दर्जात्मक साहित्य उपलब्धता व भव्य क्रीडांगण आणि निसर्गरम्य वातावरणात ही प्रशाला असल्याने गुणवत्तेचा दर्जा पुणे-मुंबई सारख्या शहराप्रमाणे राखला जातो.

केंद्रीय मंडळाचे संलग्नता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल पद्धतीप्रमाणे कृतीयुक्त शिक्षण त्याचबरोबर इंग्रजी अभ्यासक्रमाच्या अनेक सुवर्णसंधी निर्माण झाल्या आहेत असे प्रतिपादन आ.श्री प्रशांत परिचारक यांनी यावेळी व्यक्त केले.याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री शिबा नारायण दास, कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील प्राचार्या, सौ.शैला कर्णेकर व संस्थेचे ट्रस्टी श्री रोहन परिचारक तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री गणेश वाळके आदी मान्यवर उपस्थीत होते.

Leave a Reply