Headlines

ऑक्सिजन अभावी 24 तासात 24 लोकांचा मृत्यू


कर्नाटक – कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात मागील 24 तासात ऑक्सिजन अभावी विविध दवाखान्यामध्ये 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


चामराजनगर चे उपायुक्त रवी यांनी सांगितले की मृतांपैकी 23 रुग्ण हे सरकारी दवाखान्यातली असून एक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमधील होते. त्यांनी सांगितले की रुग्णांचा मृत्यू रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ च्या दरम्यान झाला आहे. ह्या व्यतिरिक्त अन्य 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. परंतु हे मृत्यू वेगळ्या प्रकारांमुळे झाल्याची माहिती आहे.


डॉक्टर म्हणाले की ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे ते सर्व व्हेंटिलेटर होते. ती म्हणाली की सर्व रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला असं म्हणता येणार नाही.


रुग्णांच्या नातेवाइकांनी दवाखान्यासमोर विरोध प्रदर्शन करत दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Leave a Reply